अमिताभ बच्चनचा आता हॉलीवूडही करणार सन्मान, ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर आता बॉलीवूडच्या महानायकाचा सन्मान हॉलीवूडही करत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हसतर्फे दरवर्षी दिला जाणारा अन् प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 चा एफआयएएफ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बच्चन यांना जाहीर झाला आहे.

https://www.instagram.com/amitabhbachchan/?utm_source=ig_embed

हॉलीवूडचे फिल्ममेकर मार्टीन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलन यांच्या हस्ते अमिताभ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या दोघांनीही अमिताभ यांनी चित्रपटक्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. अमिताभ यांनी भारतीय चित्रपट परंपरा अबाधित राखल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे या दोघांनी म्हटले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले की, यंदाचा हा पुरस्कार मला मिळणे हा माझा सन्मान आहे. मी सदैव समर्पण भावनेने काम करत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.