चिमुरड्याचा ’खईके पान बनारसवाला’वर डान्स, ‘बिग बी’ही पडले प्रेमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘खईके पान बनारस वाला’ हे गाणे ऐकले ही बिग बी अमिताभ बच्चन यांची आठवण येते. आता त्यांच्या याच गाण्यावर एका चिमुकल्याने डान्स केला आहे आणि डान्स पाहून बिग बीदेखील त्याच्या प्रेमात पडले आहे. त्यांनी चिमुकल्या डॉनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओतएक क्युट असा छोटा मुलगा आहे. जो आईच्या मांडीवर बसून अमिताभ बच्चन यांचे गाणे खईके पान बनारसवाला वर डान्स करताना दिसत आहे. मुलाचे एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत. व्हिडीओ पाहून अमिताभ यांनादेखील हसू आले. त्यांना ’हाहाहा… बेचारा..पण खूप क्युट’. अशी प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिली आहे. अमिताभ यांचे चाहतेदेखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसू फुलेल. याआधी अमिताभ यांनी आर्या नावाच्या गायिकेचे गाणे ट्वीट केले होते. अमिताभ यांनी केलेल्या ट्वीटमुळे आर्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती.