होळीच्या निमित्तानं ‘बिग बी’नं शेअर केला थ्रोबॅक फोटो, ‘जया’ यांना ओळखणंही जातेय कठीण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे चित्रपटसृष्टीतील होळी पार्टी रद्द करण्यात आल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील होळी नेहमीच धूमधड्याक्यात साजरी केली जाते. मात्र, आज संपूर्ण चित्रपटसृष्टी कोरोनाच्या सावटाखाली आहे. एकेकाळी अमिताभ बच्चनही मोठ्या उत्साहात होळी साजरे करीत असत. यावर्षी होळीच्या निमित्ताने त्याने स्वत: चे जुने फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे…होली है।’
‘रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे…होली है।’ असे कॅप्शन अमिताभ बच्चन यांनी हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाईफ फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते आपली पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासह होळी खेळताना दिसत आहेत. फोटोत अभिषेक बच्चन खूपच लहान आहे आणि तो अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर बसला आहे. या फोटोत जया बच्चन यांना ओळखणेही कठीण आहे.

 

 

 

 

 

अजूनही बॉलिवूडमध्ये अमिताभ यांची गाणी हिट
होळीच्या निमित्ताने दरवर्षी अमिताभ यांची गाणी गायली जातात. त्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे ‘सिलसिला’ मधील ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’ हे गाणे. ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’ हे गाणं लोकांना एवढे पसंत आले की, आजही होळीच्या सणात या गाण्याची धुंद अनेकांवर चढते. तर दुसरं गाणं ‘बागबान’ मधील ‘होली खेल रघुबीरा’. होळीच्या उत्सवात ही दोन्ही गाणी नक्कीच रंग भरतात.