‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आता दिसणार नाहीत ‘बिग बी’ अमिताभ ! म्हणाले – ‘थकलोय, निवृत्त होतोय’

पोलिसनामा ऑनलाईन – बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan ) यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमधून अमिताभ बच्चन (amitabh bachchan ) यांनी केबीसी शोमधून रिटायरमेंट घेत असल्याचे जणू संकेत दिले आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांनी केबीसीचा अखरेचा भाग शुट केला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

माफ करा, मी थकलोय आणि आता रिटायर झालोय. मी तुमच्या सर्वांची माफी मागतोय, कौन बनेगा करोडपतीच्या चित्रिकरणाचा अखेरचा दिवस खूपच लांबला आहे. कदाचित उद्या पुन्हा करेन. मात्र हे लक्षात ठेवा की काम तर काम असतं आणि ते तन्मयतेने करायला हवं. शुटींगच्या शेवटच्या दिवशी फेअरवेलच्या निमित्ताने खूप सारं प्रेम मिळाले. शेवटी सगळया गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. इच्छा हीच आहे की, कधीच थांबायचे नाही. सतत चालत रहायचे़ आशा आहे की, हे सगळं पुन्हा होईल. सेटवर सगळ्यांनी कायमच माझी काळजी घेतली. अनेक महिन्यांपासून सगळे जण एकत्र होतो. ते क्षण कायम आठवणीत राहतील. केबीसी शोच्या क्रुमेंबर आणि सर्व टीमचे आभार.

अमिताभ बच्चन यांच्या निर्मिती कंपनीला मोठा तोटा झाल्याने त्यांना मोठे नुकसान झाले होते. कंपनी अगदी दिवाळखोरीच्या वाटेवर आली असताना कौन बनेगा करोडपती हा टीव्ही गेम शो सुरु झाला. या शोने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला व अमिताभ बच्चन यांच्या कंपनीने राखेतून आकाशात उंच भरारी घेतली होती. तो कार्यक्रम आता अमिताभ बच्चन यांनी सोडला असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.