Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंची पुन्हा बोचरी टीका, म्हणाले अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं, मात्र मोदींच्या टीकेवर गप्प का?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On Ajit Pawar | बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले होते की, शरद पवारांना (Sharad Pawar) संपवणे हे आपले ध्येय आहे. यानंतर त्यांना अजित पवारांनी तुम्ही पुण्यातच रहा, बारामतीचं आमचे कायकर्ते पाहून घेतली, असा सल्ला दिला होता. तसेच आता अजित पवार यांनी थेट नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील ते चुकीचंच बोलले होते, त्यांनी असे बोलायला नको पाहिजे होते. यावरून आता शिरूरचे (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi) अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली आहे.(Amol Kolhe On Ajit Pawar)

अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आज शिरूरमध्ये मोठा रोड शो पार पडला. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते. कोल्हे म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना संपवायचं आहे, असे वक्तव्य केले म्हणून अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले. मग, पंतप्रधान मोदी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणाले, त्यावेळी अजित पवार का शांत बसले, असा सवाल कोल्हे यांनी केला.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीकास्त्र डागताना अमोल कोल्हे म्हणाले, आढळरावांकडून शिरुर लोकसभेची निवडणूक जिंकायची महायुतीला खात्री नाही म्हणून अजित पवार शिरुर लोकसभा मतदार संघात तळ ठोकून बसले आहेत.

अमोल कोल्हे म्हणाले, पंधरा वर्ष शिरुरकरांनी आढळराव पाटलांना निवडून दिले. मात्र त्यांनी संसदेत स्वत:च्या कंपनीच्या भल्याचे प्रश्न विचारले. हे सगळ्या जनतेला माहित आहे. यावर विचारल्यास कोणत्याही प्रकारचे उत्तर आढळराव देत नाहीत. त्यांनी शिरुरमध्ये रामलिंग महाराजांची खोटी शपथ खायची आणि दुसऱ्या दिवशी मुलाला व्हिडीओ करायला लावायचा, यातच त्यांची कबुली येते. माझ्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक गोळा होतात, हे सगळे पाहता मोठ्या मताधिक्याने मी विजयी होणार, याची खात्री आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari Sabha In Pune | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Murlidhar Mohol | मुळा-मुठा होणार सुंदर आणि प्रदूषणमुक्त – मुरलीधर मोहोळ