Amol Kolhe On Ajit Pawar | अजितदादांना अमोल कोल्हेंचा बोचरा सवाल, शरद पवारांमुळं राज्य अस्थिर झालं हा आरोप मान्य आहे का?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On Ajit Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात वापरलेल्या भाषेचा मी निषेध करतो (PM Modi Sabha In Pune). शरद पवारांमुळे (Sharad Pawar) राज्य अस्थिर झाले, हा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांना मान्य आहे का? मूग गिळून त्यांनी हे सिद्ध केलं, असा सवाल आता महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha) उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजितदादांना केला आहे. दरम्यान, अडचण अशी आहे की, अजित पवार या प्रश्नाचे थेट उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हेंच्या या प्रश्नावर अजित पवार काय म्हणतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(Amol Kolhe On Ajit Pawar)

काल पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली. या सभेत मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. नाव न घेता त्यांना भटकती आत्मा म्हटले. ही भटकती आत्मा गेल्या ४५ वर्षांपासून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी कार्यरत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पण मोदींची ही टीका अजित पवारांसाठी अडचणीची ठरत आहे. कारण पवारांच्या या ४५ वर्षांत अजित पवारांनी आपली
संपूर्ण राजकीय कारकिर्द घालवली आहे. हाच धागा पकडत कोल्हे यांनी अजित पवारांना सवाल केला आहे.

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, माझ्यासारख्या शेतकरी पुत्राचा पराभव करण्यासाठी मोदींना यावे लागते,
यातून महायुतीचा पराभव झाल्याचे दिसून येते. मात्र कितीही डावपेच केले तरी मतदार राजाचे ठरले आहे.
माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ नेत शरद पवार यांना वापरलेल्या भटकती आत्मा या शब्दावरून वातावरण चांगलेच
तापले आहे. विरोधक आणि शरद पवार गटाचे नेते आक्रमक होऊन मोदी आणि भाजपाला लक्ष्य करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार