Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | आढळरावांना डॉ. अमोल कोल्हेंनी सुनावले, ”गोविंदाचे स्वागत आणि माझ्यासारख्या कलाकाराला नाटक्या, नौटंकी…”

पिंपरी : Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | मला शेलक्या शब्दांमध्ये कायम हिणवल जाते. नाटक्या, नौटंकी म्हणतात. मग प्रश्न पडतो, हिंदी सिनेस्टार गोविदा आला तर त्यांचे स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करुन जाज्वल्य इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्या सारख्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिदे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आता पक्ष बदलला ते सातत्याने अशी टीका टिप्पणी करतात, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) शिरूर लोकसभेचे (Shirur Lok Sabha Election 2024) उमेदवार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

आढळरावर पाटील यांच्यावर खोचक टीका करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, पण कलाकाराची मनापासून कदर करणारे मुखमंत्री शिंदे (EM Eknath Shinde) यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता त्यांनी ही जी समन्वयाची महत्वाची बाब आहे. ती त्यांच्याही निदर्शनास आणून द्यावी. (Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil)

अभिनेता गोविंदा (Govinda) एकदा खासदार होते. तेव्हाचा त्यांची कामगिरी बघावी. आणि मला थोडीशी पातळी सोडून नाटक्या अशा शब्दात जर कोणी हिणवत असेल त्यांनी २०१९ ते २०२४ यामधला माझी संसदेतील कामगिरी तपासून पाहावी, असे कोल्हे म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडताना
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, पहिल्याच वेळी तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला.
शिरूर मतदारसंघाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्यानंतर कोण अशा पद्धतीने टीका करत असेल तर त्यातून ज्याची
त्याची संस्कृती दिसते. यापलीकडे काय बोलणार.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास