Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

मुंबई : Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीसोबतची (Mahavikas Aghadi) बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे (VBA Chief) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. आंबेडकर यांनी प्रथम प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना भेटले, दुसरीकडे आंबेडकर यांनी काँग्रेसच्या (Congress) काही उमेदवारांना पाठींबा जाहीर केला. आता तर स्वता आंबेडकर यांनी नव्या समीकरणाचे संकेत दिले आहेत.

पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Election 2024) इच्छूक असलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेतली यांनतर प्रकाश आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तात्यांसोबत चर्चा झालीय, दुसरी महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. जे काही अधिकृतपणे असेल ते ३१ तारखेनंतर सांगू. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात, ती कोण कोण करणार आहेत. त्यासाठी अधिकृतपणे ३१ किंवा १ तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. काही चर्चा आत्ताच उघड करता येणार नाही.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अनेक घटना अजून घडत आहेत. सामाजिक पातळीवर अनेक चर्चा आहेत. २-३ दिवसांत महाराष्ट्रात काय काय समीकरणे आहेत. ते आपल्यासमोर येईल. आजची चर्चा त्याचाच एक भाग आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवर काय घडत आहे त्यावर आज बोलत नाही. वसंत मोरेंसोबत चर्चा झाली. त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. ४-५ दिवसांत काय असेल ते समोर येईल, असे आंबेडकर म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल