Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sadashiv Peth Crime | पुण्यातील सदाशिव पेठेतील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rukimini Mandir Pune) अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यानंतर चोरट्यांनी आणखी एका मंदिरात चोरी करुन दानपेटीत असलेली रक्कम चोरुन नेली. हा प्रकार गुरुवारी (दि.28) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शनिपार मित्र मंडळ (Shanipar Mitra Mandal Trust) ट्रस्टच्या महादेव मंदिरात (Mahadev Mandir Shanipar) घडला आहे.

याबाबत निखील मधुकर जाधव (वय-32 रा. सदाशिव पेठ, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 25 ते 30 वर्षे वयोगटातील चोरट्यावर आयपीसी 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील शनिपार मित्र मंडळ ट्रस्टच्या महादेव मंदिरात गुरुवारी पहाटे 25 ते 30 वयोगटातील चोरट्याने प्रवेश केला. चोरट्याने लोखंडी सळईने दानपेटीचे कुलुप तोडून त्यामधील दोन ते तीन हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. (Theft In Temple)

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण घोडके, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Pune Sadashiv Peth Crime)

दरम्यान, सदाशिव पेठेतील प्रसिद्ध खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत.
8 मार्चच्या रात्री तीन अज्ञात व्यक्ती मंदिर परिसरात आले. त्यांनी मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला.
त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या कपाटाचे कुलुप तोडून प्राचीन चांदीच्या मुर्ती चोरून नेल्या.
यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, गणपती आणि तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचा समावेश आहे.
याशिवाय या चोरट्यांनी मंदिरातील भिंतीवर असलेलं चांदीचे मखर चोरून नेला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

Mumbai To Pune Cabs | मुंबई ते नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास महागणार, जाणून घ्या नवे दर

Vasant More-Prakash Ambedkar | वसंत मोरे उमेदवारीसाठी आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार? जरांगे-आंबेडकर-शेंडगे समीकरणातून ठरू शकतात ‘गेम चेंजर’

Bachchu Kadu Targets Navneet Rana | बच्चू कडू वर्ध्यातून निवडणूक लढवणार? ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदानाद्वारे केली मागणी, नवनीत राणांबद्दल म्हणाले…

Pune Kothrud Crime | पुणे : कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी, आयटी इंजिनिअरवर गुन्हा दाखल