Amol Mitkari | खोटे कुणबी दाखले दिले जात असल्याचा भुजबळांचा आरोप, मिटकरी म्हणाले – ‘नागपूरमधील राजे भोसले हे…’

मुंबई : Amol Mitkari | आम्हाला पूर्वीचे कुणबी दाखले मान्य आहेत. पण, माजी न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरत आहे. आणि खोटे कुणबी दाखले (Duplicate Kunbi Certificate) देण्याचे काम सुरू आहे, असा आरोप छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केला आहे. यावर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

अमोल मिटकरी म्हणाले, मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत. मी स्वत: मराठा समाजाच्या संदर्भात अनेक कुणबी दाखले दिले आहेत. नागपूरमधील राजे भोसले हे कुणबी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या तत्कालीन इतिहासातील संदर्भात कुणबी हा उल्लेख आढळतो.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) पुढे म्हणाले, मराठा समाजाची मागणी रास्त आहे.
पण, आमच्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लागता मराठा समाजाला न्याय
मिळाला पाहिजे अशी आहे.

मिटकरी पुढे म्हणाले, दोन्ही समाजाने तेढ निर्माण होतील, अशी वक्तव्य करू नये.
तसेच, जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आणि भुजबळांनी एकमेकांवर टीका करू नये.
मी कुणा एका समाजाची बाजू घेत नाही. मी ओबीसी समाजाचा एक घटक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गाडीचा कट लागल्याने दोन तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, पिंपळे गुरव येथील घटना; एकाला अटक

झटपट पैसे कमावण्यासाठी वाहनचोरी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 गुन्हे उघड

वृद्ध आई-वडिलांना मानसिक व शारीरीक त्रास न देण्याचे पुणे न्यायालयाचे उच्च शिक्षित मुलगा व सुनेला आदेश