Pune Crime News | झटपट पैसे कमावण्यासाठी वाहनचोरी करणारे गुन्हे शाखेकडून गजाआड, 4 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | झटपट पैसे कमावण्यासाठी पुणे शहर आणि परिसरात वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून 75 हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त करुन चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई मार्केट यार्ड रोडवरील आंबेडकर झोपडपट्टी येथे केली. (Pune Crime News)

ज्ञानेश्वर विजय थिटे (वय – 22), साहिल एकनाथ मळेकर (वय 18 दोघे रा. जैन मंदिर,कात्रज, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोन चे पोलीस अंमलदार हे बिबवेवाडी (Bibvewadi Police Station) व मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या (Market Yard Police Station) हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी जाधव (Shivaji Jadhav) आणि अशोक आटोळे (Ashok Atole) यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, आंबेडकर झोपडपट्टी, मार्केट यार्ड रोडवर दोन संशयित दुचाकीसोबत उभे असून या दुचाकी चोरीच्या असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी दुचाकी चोरीच्या असल्याचे सांगितले.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यांचेकडे केलेल्या तपासात भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Police Station) आणि खडकी पोलीस ठाण्यातील (Khadki Police Station) वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(IPS Ramnath Pokale), पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड
(Senior PI Nandkumar Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर लोखंडे, अशोक आटोळे,
विनायक रामाणे, शिवाजी जाधव यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सिंहगड घाटात प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटली, 10 ते 12 पर्यटक जखमी

Maharashtra Crime News | निकाह होण्यास काही तास असताना वधुची गळफास घेऊन आत्महत्या

प्रवाशाला लाकडी बांबूने मारहाण, चार जणांवर गुन्हा; उरुळी कांचन येथील घटना

Maharashtra Assembly Winter Session | वाघोलीच्या समस्या विधानसभेच्या पायर्‍यांवर

Pune Accident News | नगर -कल्याण महामार्गावर तिहेरी अपघातात ८ जण ठार; एकाच कुटुंबावर घाला

‘तेरे को आज खल्लास कर देंगे’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार, बोपोडी मधील घटना; एकाला अटक

येरवडा येथील हॉटेल पार्क ऑर्नेट हॉटेलमधील शेफ कडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

कारवर ट्रक उलटल्याने चौघांचा मृत्यु; पुणे – नाशिक महामार्गावरील घटना, महिलेसह २ वर्षाच्या मुलीचा समावेश