Amol Mitkari | ‘भगतसिंग कोश्यारी यांच्या काळ्या टोपीखालचा सडका मेंदू’ – अमोल मिटकरी

अकोला: पोलीसनामा ऑनलाइन – शनिवार (दि. 19 नोव्हेंबर) औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर भाष्य केले. त्यावर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या काळ्या टोपीखालचा मेंदू हा सडका आहे, असे अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

महाराष्ट्राचे वादग्रस्त आणि वाचाळवीर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा महापुरुषांबद्दल गरळ ओकली आहे. सातत्याने महापुरुषांचा एकेरी उल्लेख ते करत आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा देखील त्यांनी अपमान केला होता. ही त्यांची संघाची (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) कुविचारधारा त्यांनी पुन्हा एकदा प्रकट केली आहे. त्यांच्या काळ्या टोपीच्या खाली असलेला सडका मेंदू पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निदर्शनास आलेला आहे. त्यामुळे नितीन गडकरींना (Nitin Gadkari) मी विनंती करतो की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) सांगून लवकरात लवकर राज्यपालांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हाकलपट्टी करावी, असे यावेळी अमोल मिटकरी म्हणाले.

तसेच मागील चार दिवस राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांवर (V. D. Savarkar) केलेल्या वक्तव्यावर ज्यांनी तोंडसुख घेतले, ते लोक या प्रकरणात सुद्धा तसाच बाणेदारपणा दाखवतील, अशी मी अपेक्षा करत असल्याचे देखील मिटकरी म्हणाले. त्यांनी या प्रकरणात देखील राज्यपालांना प्रश्न विचारुन त्यांचा राजीनामा मागितला, तरच त्यांना देशाच्या राष्ट्रपुरुषांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे, असे यावेळी मिटकरींनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रवादीचे अध्यक्ष,
ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते,
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर ऑफ लीट (D. Litt.) ही पदवी बहाल केली गेली.
यावेळी कोश्यारी, नितीन गडकरी, शरद पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title :-  Amol Mitkari | ‘The rotten brain under the black hat of Bhagat Singh Koshyari’ – Amol Mitkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | ‘राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात परिवरर्तन होईल’ – छगन भुजबळ

India Lockdown | कोरोनाच्या टाळेबंदीची दाहकता दाखवणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला