Amravati Crime | ‘कोरोना’ चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला 10 वर्षे कारावास

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Crime | कोरोनाला (Corona) नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण राज्यभरात टेस्टिंग (Corona Testing) सुरु आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात (Amravati Crime) एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून (Private Part) स्वॅब (Swab) घेतल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनला (Lab Technician) जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) 10 वर्षे सश्रम कारावास (Jail) आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अलकेश अशोक देशमुख (Alkesh Ashok Deshmukh) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

 

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, गेल्या वर्षी अमरावती शहरातील (Amravati Crime) एका मॉलमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांची बडनेरा येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये (Trauma Care Center Badnera) कोरोना चाचणी घेण्यात आली होती.

 

सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी झाल्यानंतर कोरोना सेंटरमध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत अलकेश देशमुख या लॅब टेक्निशियन याने पीडित तरुणीला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगत गुप्तांगातूनही स्वॅब घ्यावा लागणार असे सांगून गुप्तांगातून स्वॅब घेतला. दरम्यान, पीडितेने कुटुंबियांना ही माहिती सांगितली. कुटुंबीयांनी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) चौकशी केली असता गुप्तांगातून स्वॅब घेतला जात नसल्याचे समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बडनेरा पोलीस ठाण्यात (Badnera Police Station) 28 जुलै 2020 ला तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मोदी हॉस्पिटलचा (Modi Hospital) लॅब टेक्निशियन अलकेश अशोक देशमुख याच्यावर बलात्कार (Rape) आणि विनयभंगाचा (Molestation) गुन्हा (FIR) दाखल केला होता. या घटनेमुळे अमरावती शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.

दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकी (Second District and Sessions Judge Gayki) यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा खटला चालवण्यात आला.
अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख (Additional Government Prosecutor Sunil Deshmukh)
यांनी सरकार पक्षाच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडत या प्रकरणात एकूण बारा साक्षीदार तपासले.
सरकार आणि आरोपी पक्षाची बाजू ऐकून न्यायालयाने अलकेश देशमुख याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने
दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.
तर विनयभंगप्रकरणी पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

 

Web Title :- Amravati Crime | amravati lab technician gets 10 year jail for taking swab from woman private part for covid19 test

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

National Pension Scheme (NPS) | बजेटमध्ये NPS बाबत झालेल्या घोषणेनंतर सरकारी कर्मचार्‍यांना होणार मोठा फायदा, मिळेल वाढलेले सुरक्षा कवच

 

API To PI Promotions And Transfers | पिंपरी-चिंचवड शहरातील 11 सहायक पोलीस निरीक्षकांची पदन्नोतीने बदली

 

Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)