Amravati Crime | धक्कादायक ! 15 वर्षीय मुलीवर गावातल्याच तरुणाने केला अत्याचार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Crime | एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच 22 वर्षीय तरुणाने घरात शिरुन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना (Amravati Crime) परतवाडा पोलीस ठाण्याच्या (Paratwada Police Station) हद्दीत घडली आहे. आरोपी तरुणांवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 4 (2021) सप्टेंबरला घडली आहे. गावातील स्वत:च्या घरी ती अल्पवयीन मुलगी एकटी असताना आरोपी तरुण तिच्या घरात शिरला व तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान या घटनेनंतर पिडित मुलीनं हा सर्व प्रकार आपल्या कुंटुंबीयांना सांगितला. त्यानंतर या घटनेबाबत परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Amravati Crime) करण्यात आला.

परतवाडा पोलिसांनी फिर्यादीवरून 18 सप्टेंबरला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. भा.दं.वि. चे कलम 376 (3), 452, 506 तसेच 4 पोक्सो अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अचलपूर पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर केले. त्यानंतर आरोपी़ची कारागृहात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘निवडणूकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांनाच निवडून द्या’ – अजित पवार

Karad Crime | तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार; हत्येमुळे कराड शहरात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amravati Crime | Shocking! A 15-year-old girl was tortured by a young man from the village

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update