Ajit Pawar | ‘निवडणूकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांनाच निवडून द्या’ – अजित पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | माण-खटावसाठी प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) हेच योग्य नेतृत्त्व आहे. त्यामुळे फक्त टाळ्या न वाजवता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांना निवडून देण्याचं काम करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

दिवड (ता. माण) येथे ग्रामीण विकास व सहकार या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (guardian minister of satara balasaheb patil), खासदार श्रीनिवास पाटील (mp shrinivas patil), आमदार मकरंद पाटील (MLA Makrand Patil), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने (NCP Sunil Mane, Satara), महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ (NCP Sonali Pol) , तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत (Balasaheb Sawant), उपसभापती नितीन राजगे (Nitin Rajge), युवा नेते मनोज पोळ (Manoj Pol), सुरेंद्र गुदगे, तेजस शिंदे, प्रा. कविता म्हेत्रे, युवराज सूर्यवंशी, अभयसिंह जगताप, तानाजी कट्टे, रमेश पाटोळे उपस्थित होते. दरम्यान, या वेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यासोबतच नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

NDA Cadet Dies in Pune | एनडीएमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे लष्कर न्यायालयाचे आदेश

अजित पवार म्हणाले, प्रभाकर देशमुख हे शरद पवारांच्या विचाराचे आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्त्व स्वीकारा. जे ऐकणार नाहीत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. इथे राष्ट्रवादीचा आमदार केला असता तर अनेक प्रश्न सुटले असते. इकडून तिकडे उड्या मारू नका. तसेच सरपंचांनी केवळ कडकच राहू नये तर मिळणारा निधी चांगल्या कामासाठी खर्च करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रभाकर देशमुख म्हणाले, गत निवडणुकीत काही लोकांमुळे अपयश आले. पण त्यातून स्वतःला सावरत शरद पवार व अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाची दृष्टी ठेवून काम करत आहे. या भागाला प्रगती पथावर नेहण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. राजकीय व सामाजिक परिवर्तन करण्यासाठी राष्ट्रवादी सोबत असणारा तरुण वर्ग उत्सुक आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, पोपटराव पवार, शहाजी क्षीरसागर आदींनी मनोगते व्यक्त केली.

हे देखील वाचा

Pune Crime | 4 कोटी 60 लाख रुपयांची मागणी ! सावकारीतून डोक्यात वार करुन खुनाचा प्रयत्न; वानवडी परिसरातील घटना

Thane Crime | ठाण्यातील पोलीस भरतीत गैरप्रकार ! 5 परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल; पुण्यातील एकाचा समावेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ajit Pawar | Choose only those who stand on the clock in the election Ajit Pawar in satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update