Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड, पोलिसांची मोठी कारवाई

अमरावीती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati Murder Case | देशात खळबळ उडवणाऱ्या अमरावती हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंडला (Mastermind) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफान खान (Irrfan Khan) असं त्याचं नाव असून तो एक एनजीओ चालवतो. या प्रकरणी पोलिसांनी आधीच सहा जणांना अटक (Arrest) केली आहे. इरफान खानची अटक ही अमरावती पोलिसांची (Amravati Police) मोठी कारवाई (Amravati Murder Case) समजली जाते.

 

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टमाईंड असलेल्या इरफान खानला अटक केली आहे. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ (Rahbar NGO) चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी कोल्हे यांची हत्या केली. (Amravati Murder Case)

 

प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. परंतु आज तब्बल 12 दिवसांच्या तपासानंतर अमरावती शहर पोलिसांनी (Amravati City Police) ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळे झाली असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आल्याचे ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली हे विशेष.

या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम Mudassir Ahmed Sheikh Ibrahim (वय-22),
शाहरुख पठाण हिदायात खान Shahrukh Pathan Hidayat Khan (वय-25),
अब्दुल तौफिक शेख तसलीम Abdul Tawfiq Sheikh Tasleem (वय-24),
शोएब खान साबीर खान Shoaib Khan Sabir Khan (वय-22),
आतिब रशीद आदिल रशीद Atib Rashid Adil Rashid (वय-22)
आणि युसूफ खान बहादूर खान Yusuf Khan Bahadur Khan (वय-44) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये आता मास्टरमाईंड इरफान खान याचा समावेश झाला आहे.

 

Web Title :- Amravati Muder Case | maharashtra amravati murder case mastermind irrfan khan arrested major police action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचे वक्तव्य, बँकांना दिले हे महत्वाचे निर्देश