Amrita Arora Birthday : मलायकाने दिल्या अमृताला ‘अशाप्रकारे’ वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोराची बहिण अमृता अरोराचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ‘Happy bday my Amu,amzu,amolla,amutti,ams, ….. alll names of endearment , coz we love u♥️’

अमु, अमजु, अमोला, अमूटी हे सगळे अमृताचे निक नाव आहे. कॅप्शन संपल्यानंतर मलायकाने लिहले आहे की, ‘हे नाव ऐकल्यानंतर रडायला सुरुवात करु नकोस’ असे लिहून तिने अमृतासोबत खूप सारे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघींची बॉन्डिंग किती छान आहे. दोघी एकमेकांना खूप सपोर्ट करतात. मलायका आणि अमृता या दोन्ही बहिणींना नेहमीच फिट राहायला आवडतं. फक्त दोघीच नसून आणखी एक खास यांची मैत्रीण आहे. ती म्हणजे करिना कपूर. कोणतीही पार्टी, प्रोग्रॅम किंवा चित्रपटाशी जोडलेली गोष्ट असो तिघीही नेहमी एकत्र दिसतात. अमृता आणि करिना जीवलग मैत्रिणी आहे. त्याचसोबत त्या जीम पार्टनरही आहेत.

मलायका आणि अमृता या दोघींबद्दल बोलायचे म्हणले तर बॉलिवूडमधल्या हॉट बहिणी कोण, असा प्रश्न जर कोणाला विचारला तर क्षणाचाही वेळ न घालवता मलायका अरोरा आणि अमृता अरोराचंच नाव पुढे येईल. त्यांच्या सौंदर्याची जादू अशी आहे की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी या बहिणी कधी एकत्र दिसल्या की आजही फोटोग्राफरचे कॅमेरे आपसूक त्यांच्याकडेच वळतात.