Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट

पोलीसनामा ऑनलाइन : Amruta Deshmukh | बिग बॉसचा प्रत्येक पर्व प्रेक्षकांना मनोरंजन करण्यात कुठेच मागे राहिला नाही. सध्या बिग बॉस मराठीचे चौथे पर्व देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. यंदाच्या पर्वामध्ये अनेक आश्चर्य प्रेक्षकांना त्याचबरोबर स्पर्धकांना देखील या घरांमध्ये पाहायला मिळाले आहेत. आता या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर जाणार असल्यामुळे मोठा ट्विस्ट दिसणार आहे. (Amruta Deshmukh)

नुकतीच बिग बॉसच्या घरातून विकास सावंतने एक्झिट घेतली होती. तर आता त्याच्या पाठोपाठच बिग बॉसच्या घरातून अमृता देशमुख बाहेर पडणार आहे. सुरुवातीच्या काळात अमृता घरात वावरताना दिसत नव्हती. मात्र नंतर तिने तिची खेळी दाखवायला सुरुवात केली होती आणि प्रत्येक टास्कमध्ये तिची आक्रमकता देखील दिसू लागली होती.

पहिल्या आठवड्यापासून घरातील सदस्य अमृताला नॉमिनेशन टास्क मधे नॉमिनेट करत होते.
आता या दोघांच्या जाण्याने घरातील स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी अजूनच चतुराईने खेळ खेळताना
दिसणार आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता देशमुखचे नाव नक्कीच घेतले जाते.
तर ‘फ्रेशर्स’ या शोमुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली होती. अमृता अभिनेत्री बरोबरच एक आर.जे. ही आहे.
पुण्याची टॉकरवडी म्हणून ती प्रसिद्ध आहे.

Web Title :- Amruta Deshmukh | bigg boss marathi 4 amruta deshmukh evicted from the house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम