Amruta Fadnavis | नवाब मलिक यांच्या आरोपांवर अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘चोराच्या…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ड्रग्स प्रकरणात (Drugs case) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप केले आहेत. तसंच, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता. शिवाय जयदीप राणा (Jaideep Rana) या ड्रग्स पेडरलनं (Drugs peddler) अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी गायलेल्या रिव्हर अँथमला अर्थसहाय्य केलं होतं. असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देतना अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते! असं प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मलिकांना दिले आहे.

नवाब मलिक काय म्हणाले ?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या पत्नीने अमृता यांनी एक गाणं गायलं होतं. नदी संरक्षण अभियानासाठी ‘रिव्हर साँग’ बनवलं होतं. त्यात सोनु निगम (Sonu Nigam) आणि अमृता यांनी गाणं गायलं होते. तर त्यात देवेंद्र फडणवीस यांनी अभिनय केला होता. या गाण्याला जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवलं होतं. राणा हे ड्रग्स पेडलर आहेत. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गणपती दर्शनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा एकत्र आहेत. तसेच फोटोही आहेत. हे प्रकरण राज्यातील ड्रग्स व्यवसायासंबंधित आहे, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.

 

 

Web Title :- Amruta Fadanvis | amruta fadanvis reaction on ncp minister nawab malik serious allegations on devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या मुलीला कधीही भासणार नाही पैशांची कमतरता ! केवळ 416 रुपये गुंतवून मिळवा 65 लाख, जाणून घ्या

T20 World Cup | अजूनही टॉप 2 मध्ये राहू शकतो भारत, नॉकआऊटसाठी करू शकतो ‘क्वालिफाय’

EPFO | जर अजूनही आले नसतील तुमच्या अकाऊंटमध्ये PF च्या व्याजाचे पैसे तर असे तपासू शकता; जाणून घ्या पद्धत

Pune Crime | रिक्षा चालकांनो सावधान ! रिक्षात विसरलेल्या सामानाच्या बदल्यात पैसे मागाल तर जेलमध्ये जावं लागेल; मुंढवा पोलिसांकडून ‘खंडणी’ प्रकरणी एकाला अटक