अमेरिकेतील कॉन्सर्टमध्ये दिसला ‘मिसेस सीएम’ अमृता फडणवीस यांचा ‘रॉकस्टार’ व ‘ग्लॅमरस’ लुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच लॉस एन्जेलिस आणि कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉन्सर्टमध्ये सहभाग नोंदवला. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी जय हो चॅरिटी म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं.

अमृता यांच्या या कॉन्सर्टला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. अमृता या व्यवसायानं बँकर आहेत. सोबतच त्या उत्तम गायिका आहेत.

 

अमृता फडणवीस यांनी आपल्या म्युझिक कॉन्सर्टचे काही फोटो शेअर केले आहेत. अमृता या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत होत्या. अमृतांचा हा लुक इतका सुंदर होता की, त्या एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीसारख्याच दिसत होत्या. तुम्हाला सांगू इच्छितो की, या कॉन्सर्टमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत गायक सुखविंदर सिंग देखील सहभागी झाला होता. आणखी महत्त्वाची बाब अशी की, हृदयविकार, ल्युकेमिया असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रुग्णांच्या मदतीसाठी हा शो आयोजित करण्यात आला होता.

अमृता फडणवीस यांनी शोमधील त्यांचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्या या उपक्रमाचे कौतुकही केले आहे. त्यांचे हे फोटो हजारो लोकांनी लाईक केले आहेत तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.