Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाविरूध्द गुन्हा, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका महिलेने एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न (Attempt to Pay Bribe) केला. याप्रकरणी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी डिझायनर अनिक्षा (Designer Aniksha) विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत मलबार हिल पोलीस (Malabar Hill Police Station) ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवला आहे. एफआयआर नुसार डिझायनर अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक कोटी रुपये लाचेची ऑफर अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी अमृता फडणवीस यांना दिली.

एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या व्हिडीओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक मेसेज एका अज्ञात फोन क्रमांकावरुन त्यांना पाठवले. तिच्या वडिलांसोबत, ती महिला अप्रत्यक्षपणे धमकी देत होती. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसी 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात एका विरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास
पोलीस करीत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Web Title :-  Amruta Fadnavis | amruta fadnavis files fir against designer Aniksha alleges threat conspiracy and offering rs 1 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Symptoms Of Influenza Virus | इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे आवाहन

Suresh Hemnani | महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी सुरेश हेमनानी यांची नियुक्ती

MLA Siddharth Shirole | सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा; विशेष निधीच्या तरतुदीची गरज – आमदार सिद्धार्थ शिरोळे