मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Siddharth Shirole | नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा याकरिता भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांनी विधानसभेत अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना आज (बुधवारी) केली.
शिवाजीनगर मतदारसंघामध्ये (Shivajinagar Vidhan Sabha Constituency) अनेक सेवा वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये मी सार्वजनिक स्वच्छतागृह पाहणी अभियान सुरू केले. आत्तापर्यंत जवळपास १०० सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मला शौचालयांची दुरावस्था निदर्शनास आली.
यामध्ये प्रामुख्याने पाण्याची कमतरता असणे व ड्रेनेज वारंवार तुंबत असणे या समस्या बहुतेक सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी असतात आणि यामुळेच नागरिक सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर कमी प्रमाणात करतात.
या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक सेवा वस्त्यांमध्ये पाणी व ड्रेनेज साठी योग्य निधी खर्च करावा
तसेच पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची व्यवस्था उभी केली तर नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.
तरी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना भरीव निधीची तरतूद करावी,
असे आमदार शिरोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Web Title :- MLA Siddharth Shirole | Improve the quality of public toilets; Need for special fund provision – MLA Siddharth Shirole
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Back Pain चा किडनीशी आहे जवळचा संबंध, जाणून घ्या – पाठीत कुठे वेदना असतील तर असू शकतो मोठा आजार