Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरच्या वडिलांचा नृत्याला होता विरोध

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरकडे (Amruta Khanvilkar) पाहिले जाते. अनेक चित्रपटांमध्ये अमृताने आपल्या जीवंत अभियनाने व नृत्याने घायाळ केले आहे. अमृता खानविलकर ही अभिनेत्री सोबतच उत्कृष्ट नृत्यांगणा म्हणून ओळखली जाते. तिच्या फक्कड लावणीचे अनेक चाहते आहेत. मात्र तिचे हे नाचणे तिच्या वडिलांना मान्य नव्हते असा खुलासा अमृताने (Amruta Khanvilkar) केला आहे. एका मुलाखती दरम्यान अमृताने तिच्या वडिलांचे नृत्याबद्दलचे मत सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

आज मराठी सिनेविश्वातील उत्तम नृत्यांगणा व लावणी करणारी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरचे (Dancer Amruta Khanvilkar) नाव घेतले जाते. अभिनेत्री अमृता खानविलकरने एका मुलाखती दरम्यान तिच्या वडिलांचा नृत्याला विरोध होता हे सांगितले आहे. अमृता म्हणाली की, “माझ्या बहिणीचा कथ्थकचा कार्यक्रम मी बघायला गेले होते. तेव्हा मलासुध्दा डान्स शिकण्याची इच्छा होती. पण माझ्या बाबांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांनी मला डान्स करण्याची परवानगी कधीच दिली नाही.” असे अमृताने सांगितले. मात्र नंतर अमृताने तिची आवड जपली व नृत्य शिकली. आणि त्यामध्येच करिअर केले. आज अमृताने चांगली नृत्यांगणा म्हणून चाहत्यांच्या मनात घर केले आहे. अनेक लावण्या अमृताने आपल्या नृत्याने गाजवल्या आहेत.

 

 

 

 

अभिनेत्री अमृता खानविलकरने लावणीतील (Amruta Khanvilkar Lavani) अदाकारी व एक्स्प्रेशन यामुळे अनेक लावण्या गाजवल्या आहेत. नटरंग (Natrang) चित्रपटातील वाजले की बारा (Wajle Ki Bara), चंद्रमुखी चित्रपटातील (Chandramukhi Movie) अनेक लावण्या अमृताने (Amruta Khanvilkar) सादर केल्या आहेत. तसेच तिने नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टसमध्ये (NCPA) कथ्थक नृत्य सादर केले आहे. याच बरोबर अमृता नृत्याशी निगडित अनेक रियलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. तिने ‘नच बलिए’ (Nach Baliye), व ‘झलक दिखला जा’ (Jhalak Dikhla Ja) या डान्स रियलिटी शोमध्ये अनेक जबरदस्त परफॉर्मन्स सादर केले आहेत. या शोमधून ही तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर ही लवकरच (Amruta Khanvilkar Upcoming Movie) महिला धावपटू ललिता बाबर (Lalita Babar) यांच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच ती ‘कलावती’ (Kalavati) या दिग्दर्शक संजय जाधव (Director Sanjay Jadhav) यांच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

 

 

 

Web Title : Amruta Khanvilkar | amruta khanvilkar father was against her dancing actress reveals the memory

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका