इमानदार रिक्षाचालकाने प्रवाशाचे हजारों रुपये केले परत, पोलीसांकडून सत्कार

पिंपरी : पोलीसनामा आॅनलाइन – इमानदार रिक्षा चालकाने १७ हजार रोख रक्कम आणि शैक्षणिक कागदपत्रे हे मूळ मालक असलेल्या प्रवाश्यापर्यंत पोहचवून अद्यापही मानसुकी शिल्लक असल्याचे उदाहरण दिले आहे. रणजित जाधव अस इमानदार रिक्षा चालकाचे नाव असून ते थेरगाव येथे रहातात. तर प्रदीप एकशिंगे अस प्रवाशी तरुणाचे नाव आहे. कामगिरीचे कौतुक करत काळेवाडी पोलिसांनी रिक्षा चालक रणजित जाधव यांचा सत्कार केला आहे.
प्रदीप एकशिंगे हा तरुण मूळ लातूरचा असून तो पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी निमित्त आला होता. काम झाल्यानंतर रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रिक्षा चालक रणजित जाधव यांच्या रिक्षात बसून काळेवाडी येथील खासगी बस स्थानका जवळ घाईत उतरला. तेथून तो खासगी बस ने लातूरला जाणार होता. काही मिनिटांनी आपल्या रिक्षात प्रवाश्याची बॅग असल्याचे लक्ष्यात आले. ती बॅग घेऊन रिक्षा चालक रणजित जाधव यांनी थेट काळेवाडी पोलीस चौकी गाठली. बॅगेत १७ हजार रुपये रोख रक्कम शैक्षणिक कागदपत्रे आणि कपडे होते.
पोलिसांनी तात्काळ कागदपत्रे तपासली असता त्यात प्रदीप एकशिंगे याच्या वडीलांचा मोबाईल नंबर मिळाला पोलीस अधिकाऱ्याने त्यावर फोन करत संबंधित माहिती दिली. हरवलेली बॅग काळेवाडी चौकीत असल्याचे प्रदीप च्या वडिलांना सांगितले. हीच माहिती वडिलांनी प्रदीपला फोन द्वारे दिली. प्रदीप ताबडतोब काळेवाडी पोलीस चौकीत आला आणि आपली विसरलेली बॅग घेऊन परत परतीच्या वाटेला निघाला. प्रदीपने रिक्षा चालकाचे आभार मानले असून रणजित जाधव यांची इमानदारी पाहून पोलिसांनी त्यांचे यांचे कौतुक केले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरेंद्र चव्हाण, पोलीस कर्मचारी दातार, मोमीन राठोड यांनी पुष्प गुच्छ देऊन रणजित जाधव यांचा सत्कार केला.

पुण्यात डोंगरावरून उडी मारून युवकाची आत्महत्या