भारतीय हवाई दलाचे मिन 21 ला अपघात; पंजाबमधील मोगा गावाजवळ कोसळले

मोगा : वृत्त संस्था – भारतीय हवाई दलाचे मिग २१ लढाऊ विमानाला काल रात्री उशिरा अपघात झाला. पंजाबमधील मोगाजवळ ते कोसळले. हा अपघात झाला तेव्हा नियमित प्रशिक्षणासाठी त्याने उड्डाण घेतले होते. पायलट स्वार्डन लिडर अभिनव चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत.

राजस्थानमधील सूरतगढ स्टेशनवरुन काल रात्री प्रशिक्षणासाठी या मिग २१ विमानाने उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच त्यात बिघाड झाला व विमानाने पेट घेतला. पायलट अभिनव चौधरी यांनी आपली सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर हे विमान पंजाबमधील मोगाजवळ कोसळले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हवाई दलाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.