IPL च्या आधी RCB फ्रेंचायझीमध्ये मोठा बदल, टीमचा पहिला सामना 21 सप्टेंबरला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डियाजिओ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आनंद कृपालू हे 1 ऑक्टोबरपासून संजीव चुरीवाला यांच्या जागी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रेंचायझी रॉयल चॅलेन्जर बेंगलोर (आरसीबी) अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.

आनंद डियाजिओ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारीसह भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. फ्रेंचायझीच्या नेतृत्वात बदल झाल्याबद्दल आनंद म्हणाले की, ‘रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर हा डायजिओ इंडियाचा अविभाज्य भाग आहे आणि गेल्या सहा वर्षांपासून मी पडद्यामागून संघाच्या प्रवासाचा एक भाग आहे.’ ते म्हणाले की, नवीन सत्राच्या सुरुवातीपासून ‘विराट (कोहली), माईक ह्यूसन आणि सायमन कॅटिच यांच्यासह संघाचे नेतृत्व करणे हे एक नवीन रोमांचक अध्याय होईल.’

ते म्हणाले की, ‘मी आरसीबी आणि डियाजिओला दिलेल्या योगदानाबद्दल संजीवचे आभार मानू इच्छितो आणि त्यांच्या भविष्यातील भूमिकेसाठी शुभेच्छा देतो.’ त्याचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) बरोबर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) टीम –
एरॉन फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, एडम जंपा, इसुरु उदाना, मोईन अली , जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.