Ananya Pandey – Aditya Affair | अनन्या आणि आदित्यचे नक्की चाललंय तरी काय? स्पेनमधील फोटोंनी अफेअरच्या चर्चांना उधाण

पोलीसनामा ऑनलाइन – Ananya Pandey – Aditya Affair | बॉलीवुडमधील (Bollywood News) अनेक हिरो हिरोईन्सच्या अफेअरची चर्चा सध्या सुरु आहे. अनेकांनी कबुली दिली आहे तर काही कपल आपले सिक्रेट लव रिलेशन (Secret Love Relation) एन्जॉय करताना दिसत आहेत. बी टाऊन मधील असेच एक चर्चेतील कपल म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) व अभिनेत्री अनन्या पांडे. (Ananya Pandey – Aditya Affair) हे कपल सध्या चर्चेच्या वर्तुळामध्ये आहे आणि ते एकत्र परदेशात स्पॉट देखील झाले आहेत.

अनन्या पांडे व आदित्य रॉय कपूर (Ananya Pandey – Aditya Roy Kapoor) हे दोघे अनेकदा एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात. अनन्या व आदित्य यांचा चाहता वर्ग मोठा असून त्यांच्या अफेअरबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. सध्या ते एका म्युझिक कॉन्सर्टला एकत्र गेलेले दिसून आले. स्पेनमध्ये (Spain) झालेल्या आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टमध्ये (Arctic Monkeys Concert) त्यांनी एकत्र उपस्थिती लावली होती. अनन्या पांडे व आदित्य रॉय कपूर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोघांनी आपले स्पेनमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामुळे ते दोघे एकत्र स्पेनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टचेही दोघांनी आपापल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री अन्यना पांडे हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला कॉन्सर्टची व्हिडिओ अपलोड केली होती. यामध्ये तिने आनंदाने कॉन्सर्टची मज्जा घेत होती. तिने या स्टोरीला ,”आर्क्टिक मंकीजसारखं काही नाही… माझं आवडतं गाणं”. असे कॅप्शन दिले होते. आदित्यनेही याच कॉन्सर्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरुन तरी त्यांचे चोरी छुपे लव अफेअर सुरु आहे असे सोशल मीडियावर बोलले जात आहे. (Ananya Pandey Affair) मात्र दोघांनी अद्याप आपल्या नात्याबद्दल कबुली दिलेली नाही. मात्र आदित्यने ‘कॉफी विथ करण’ (Coffee With Karan) या प्रसिद्ध चॅट शोमध्ये त्याच्या रिलेशनशिपबाबत संकेत दिले होते. अनन्या मात्र अजून लग्नासाठी तयार नाही असे तिने सांगितले आहे.

बॉलीवुडमधील कलाकरांमध्ये अनन्याचे नाव सतत चर्चेत असते. (Ananya Pandey and Aditya Affair) तिच्या अभिनयामुळे व वैयक्तिक आयुष्यामुळे अनन्या पांडे चर्चेचा विषय ठरत असते. (Ananya Pandey Boyfriend) ती याआधी अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) सोबत ‘लायगर’ (liger) चित्रपटामध्ये झळकली मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता ती लवकरच ‘ड्रीम गर्ल 2′ (Dream Girl 2) या बहुचर्चित चित्रपटामध्ये अभिनेता आयुषमान खुरानासोबत (Ayushmann Khurrana) स्क्रीन शेअर करणार आहे. तर अभिनेता आदित्य रॉय कपूर हा ‘मेट्रो इन दिनों’ (Metro In Dino) या चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे.

Web Title : Ananya Pandey – Aditya Affair | aditya roy kapur and ananya panday confirm dating rumours share pics from arctic monkeys concert in spain on instagram

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा