Kapil Sharma | कपिल शर्माच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाची घेतली ऑस्करने दखल; खास लाब्ररीमध्ये देणार स्थान

पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) करिअरमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे कारण कपिलच्या एका फिल्मची दखल ऑस्करने (Oscar) घेतली आहे. कपिल शर्माचा चित्रपट ‘ज्विगाटो’ (Zwigato Movie) ऑस्करच्या खास लायब्ररीमध्ये (Zwigato In Oscar Library) स्थान देण्यात आले आहे. ज्विगाटो चित्रपटातील कपिल शर्माच्या ऍक्टिंगचे कौतुक करण्यात आले होते. कपिलने (Kapil Sharma) त्याच्या अभिनय कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. मात्र आता ऑस्करने चित्रपटाची दखल घेतल्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम आनंद व्यक्त करत आहे.

जगभरातील सिनेविश्वामध्ये ऑस्कर पुरस्काराला (Oscar Award) खूप महत्त्वाचे स्थान आहे. तो पुरस्कार बहुमानाचा मानला जातो. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स (Academy of Motion Picture Arts and Sciences) अर्थात ऑस्कर मिळवण्यासाठी अनेक लोक शर्तीचे प्रयत्न करत असतात. भारतीय चित्रपट ‘ज्विगाटो’ हा अकदामीच्या चित्रपटांच्या खास लायब्ररीमध्ये शामिल करण्यात येणार आहे. तसा मेल चित्रपटाच्या लेखकांना ऑस्कर मार्फेत करण्यात आला आहे. ही खुशखबर ‘ज्विगाटो चित्रपटाची’ लेखिका व को-डायरेक्टर नंदिता दास (Nandita Das) यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोशल मीडियावर ऑस्कर लायब्ररीबद्दल (Oscar Library) आनंदाची बातमी शेअर करत नंदिता शर्मा हिने चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत ‘ज्विगाटो’ चित्रपटाची पटकथा ऑस्करच्या लायब्ररीमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. कॅप्शनमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नंदिताने लिहिले आहे की, “अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर) च्या लायब्ररीकडून ईमेल आला असून ऑस्करला त्यांच्या कायमस्वरूपी कोर कलेक्शनसाठी ज्विगाटो (Zwigato Movie) ची स्क्रिप्ट हवी असल्याबद्दल यामध्ये लिहिले आहे. या ईमेलमुळे खूप आनंद झाला असून आश्चर्य देखील वाटत आहे. ही एक आनंदाची आठवण असून, हा चित्रपट रिलिव्हंट आहे आणि आम्ही तो बनवला याचा मला खूप आनंद होत आहे.

माझा विश्वास आहे की जेव्हा कथा खऱ्या असतात आणि संदर्भांमध्ये खोलवर रुजलेल्या असतात, तेव्हा त्या संस्कृती व सीमेच्या पलीकडे जातात. आणि जागतिक सिनेमाचा भाग बनतात. मला आनंद आहे की ही चित्रपटांची लायब्ररी विद्यार्थी, चित्रपट निर्माते आणि लेखकांसाठी उपलब्ध असेल. ज्विगाटोला प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळेच यासारखे अनपेक्षित दरवाजे उघडले आहेत. आशा आहे की OTT प्लॅटफॉर्म हे वाचत असतील! मला वाटते की प्रेक्षकांना झ्विगाटो पाहण्याची संधी देण्याची आता वेळ आली आहे.”

कॉमेडयन म्हणून विख्यात असलेल्या कपिल शर्माने (Kapil Sharma) ‘ज्विगाटो’ चित्रपटामध्ये डिलिव्हरी बॉयची (Delivery Boy)
भूमिका साकारली आहे. कपिलचा हा तिसरा सिनेमा असून यामधील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे.
या ज्विगाटो चित्रपटाची कहानी पूर्णपणे डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यावर, डिलिव्हरी करताना त्याला येणाऱ्या अडचणींवर आधारित आहे.
या नंदिता दास हिने चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून हा चित्रपट याच वर्षी 17 मार्चला प्रदर्शित झाला होता.
(Oscar To Indian Cinema) या ‘ज्विगाटो’ चित्रपटाला प्रेक्षकांची व चित्रपट समीक्षकांची पसंती मिळाली होता.
‘ज्विगाटो’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 3.53 कोटी रुपयांचा गल्ला कमावला. आता ‘ज्विगाटो’ चित्रपटाची पटकथा
ऑस्करच्या स्पेशल लायब्ररीमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Web Title : Kapil Sharma | kapil sharma zwigato gets place in oscars library nandita das comments to ott platforms

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा