Maharashtra Cabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री यांच्यात खलबतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (बुधवार) सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठीच्या हालचालींना प्रचंड वेग आल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) आणि अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लवककरच मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होऊन खातेवाट देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील (Shinde Group) काही मंत्र्यांना डच्चू देण्याबरोबरच नव्या मंत्र्यांना शपथ देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नऊ आमदारांना शपथ दिल्यानंतर भाजप तसेच शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) करण्यासाठी दोन्ही ठिकाणच्या आमदारांचा दबाव वाढत असल्याने शपथविधीसाठी बुधवारी सायंकाळी मुहूर्त शोधण्यात आल्याची चर्चा आहे.

‘राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या एक ते दोन दिवसांमध्ये होईल. विस्तारासाठी आम्ही तयारीमध्ये बसलो आहोत. आम्हाला कधीही कॉल येईल आणि तसे आम्ही निघू, आम्हाला आणि भाजपला प्रत्येकी सात मंत्रिपदे मिळतील,’ असा दावा शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मंगळवारी केला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुण्यातही हालचाली –

पुण्यातील (Pune) इच्छुक आणि संभाव्य आमदारांकडूनही बुधवारी सायंकाळी शपथविधी होणार असल्याचे बोलले जात आहे.
परंतु, मुंबईतून निरोप नसल्याने आपण पुण्यातच आहोत आणि निरोपाची वाट पाहत असल्याचे काही आमदार (MLA) म्हणत आहेत.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात अपक्ष आमदारांनाही स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातून दौंडचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul), भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge),
आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), सुनील कांबळे (Sunil Kamble) मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.
यातील काही आमदारांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यानंतर मंगळवारीच मुंबई गाठली होती.

Web Title :  Maharashtra Cabinet Expansion | shinde fadnavis ajit pawar govt cabinet expansion may take place today evening

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा