….आणि धोनीकडे पुन्हा आले कर्णधार पद 

दुबई : वृत्तसंस्ठा
भारतीय क्रिकेट संघाला आज आशिया कप सुपर फोरच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक करण्यासाठी रोहित शर्माऐवजी धोनी मैदानात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

रोहित शर्माला विश्रांती दिल्यामुळे धोनी आज भारताचा कर्णधार बनला आहे. ६९६ दिवसानंतर धोनी पुन्हा एकदा भारतीय टीमचा कर्णधार बनला आहे. महेंद्र सिंह धोनी आज कर्णधार म्हणून २०० वा वनडे सामना खेळतो आहे.

नाणेफेक झाल्यानंतर धोनी कर्णधारपदाबाबत म्हणाला की, ‘ही कर्णधारपदाची माळ अचानक आणि नशिबाने माझ्या गळ्यात पडली आहे. मला हे पुन्हा घडतंय यावर अद्यापही विश्वास बसत नाहीये. मी आतापर्यंत १९९  एक दिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि आता २०० व्या सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व नशिबाने घडले आहे. कर्णधारपद मी स्वत: सोडल्याने हे माझ्या हातात नव्हते.’

 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’150dea5b-c0bf-11e8-93ba-fb94fe4140d1′]
आशिया चषक स्पर्धेत सुपर फोर फेरीत बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलेल्या भारताचा सामना आज अफगाणिस्तान विरुद्ध होत आहे. अफगाणिस्तानने साखळी फेरीत बांगलादेश आणि श्रीलंका यांना हरविले होते.

3 इडियट्सची ‘ती’ रँचो वॉल इतिहास जमा होणार

[amazon_link asins=’B019XSHB7O,B06Y5P68KC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’041eef05-c0c0-11e8-a745-ad54202e6624′]