Andheri Bypoll | शिवसेनेचे टेन्शन वाढले! ‘या’ उमेदवाराची अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची आयोगाकडे केली मागणी

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून (Andheri Bypoll) भाजपने (BJP) मुरजी पटेल (Murji Patel) यांची उमेदवारी मागे घेतल्यानंतर मोठा संघर्ष थंडावला होता. तसेच शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय सोपा झाला होता. परंतु, एका अपक्ष उमेदवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) पत्र लिहून उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयोग कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Andheri Bypoll)

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri Bypoll) बिनविरोध होणे अवघड आहे. कारण या ठिकाणी भाजपने उमेदवारी मागे घेतली असली, तरी अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी मिलिंद कांबळे (Milind Kamble) या अपक्ष उमेवाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेनेकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्राची दखल घेतल्याने आयोग कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी म्हटले आहे की, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून
(Andheri East Assembly By-Election) माघार घ्यावी, यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव
टाकण्यात आला. तसेच धमकीही देण्यात आली. तसेच अन्य अपक्ष उमेदवारांवर दबाव टाकून त्यांनाही निवडणूक
प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज भरले होते.
परंतु, मनसे (MNS) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) आवाहनानंतर भापजने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती.
त्यामुळे या निवडणुकीतील चुरस संपली होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 03 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
तर 06 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

Web Title :- Andheri Bypoll | andheri bypoll milind kamble allegations on thackeray group to withdraw application and demand to election commission to cancelled election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | भाजपा खासदाराचा शिवसेनेला टोला, म्हणाले – ‘मुख्यमंत्री पद गेल्यानंतर महाराष्ट्राची…’

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के