Andheri East By-Election | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन राजकारण तापलं, भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Andheri East By-Election) आता शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगणार आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Andheri East By-Election) होणार आहे. मात्र या पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजीचा सूर असून, अंतर्गत धुसपूस वाढत जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अनेकजण इच्छुक असताना आयारामला तिकीट का अशी विचारणा पक्ष नेतृत्वाकडे करत असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी (Andheri East By-Election) भाजपकडून आयात केलेले पटेल यांना संधी दिली जाणार आहे. परंतु या निर्णयामुळे काही इच्छुक माजी नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपकडून उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही नाराजी दूर करण्याची जबाबदारी भाजपच्या अनेक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती
(Shiv Sena-BJP Alliance) असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला.
यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी अपक्ष (Independent) निवडणूक लढवली होती.
पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन केल्यामुळे ही खरच बंडखोरी होती की,
पक्षाच्या संमतीने अपक्ष लढवलेली निवडणूक, असा प्रश्न विचारला जात होता.

Web Title :- Andheri East By-Election | andheri east bypoll bjp leader disappointed over candidature to murji patel by party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा