Andheri East by-Election| ऋतुजा लटके यांना शिंदे गटात पळविण्याचा प्रयत्न? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातील वाद जून महिन्यापासून सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) त्यासंबंधी अनेक खटले प्रलंबित देखील आहेत. हा वाद काही काळ पुढे चालू राहीला असता, पण आयोगाला हंगामी निर्णय घेत, या वादावर तात्काळ पडदा टाकावा लागला आहे. कारण शिवसेनेचे अंधेरी पूर्व येथील (Andheri East by-Election) आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latake) यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुका (Andheri East by-Election) लागल्या आहेत.

शिवसेनेच्या दोनही गटांनी आपला उमेदवार येथे देण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचमुळे आता निवडणूक आयोगाला दोन्ही गटांना हंगामी नावे आणि चिन्हांचे वाटप करावे लागले. महाविकास आघाडीकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना शिंदे गटात आणून उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
त्यावर शिंदे यांच्या गटानचे आमदार आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीशी (Andheri East by-Election) संबंधित निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.
या बद्दल मला कोणतीच माहिती नाही. मात्र, अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमेदवार उभा असेल, तो युतीचा असेल आणि तो आमच्या बहुमताने निवडून येईल, असे उदय सामंत म्हणाले.

Web Title :- Andheri East by-Election | uday samant statement on andheri east bypoll and rutuja latke candidature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा