‘श्रध्दा’ की ‘अतिशोक्‍ती’, ‘त्या’आमदाराने चक्‍क मुख्यमंत्र्यांच्या नावाने घेतली ‘शपथ’

विजयवाडा :वृत्तसंस्था -राजकारणात अनेक नेते आपल्या नेत्याला आदर्श मानत त्यांच्या पावलावर पाऊल  ठेवत काम करत असतात. मात्र आंध्रप्रदेश मध्ये एका आमदाराने चक्क आपल्या नेत्याप्रती श्रद्धा दाखवण्यासाठी विधानसभेत त्यांच्या नावाने शपथ घेतली. आंध्र प्रदेशमधील एका नवनिर्वाचित आमदाराने ईश्वराची शपथ न घेता चक्क मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांप्रती आपली असलेली श्रद्धा आणि विश्वास दर्शवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे  त्यांनी सांगितले. आमदार कोटामरेड्डी श्रीधर रेड्डी असे त्यांचे नाव असून ते आंध्र प्रदेशमधील नेल्लोर ग्रामीण येथील ते आमदार आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ते आमच्यासाठी देव आहेत, त्यामुळे मी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतल्यानंतर त्यांना सभापतींनी तात्काळ ईश्वराचे नाव घेत शपथ घेतली. यावेळी ते भावुक झाले होते. या शपथविधीविषयी बोलताना ते म्हणाले कि, मी अशा एका गरीब कुटुंबातून आलो आहे ज्याला काही राजकीय पार्श्वभूमी नाही. मला त्यांनी दोन वेळा आमदार बनविले.मागील पाच वर्षाचा माझा पगार मी गरीब मुलांना दिला आहे. त्यामुळे हे कृत्य मी कोणतेही पद  मिळवण्यासाठी केले, असे काही नाही.

दरम्यान, याआधी देखील तेलगू देसम पक्षाच्या काही आमदारांनी एनटी रामराव यांच्या नावाने शपथ घेतली होती. त्यामुळे आपण देखील कोणताही नियम न मोडता हि शपथ घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त

आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात 

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार 

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात