दुर्दैवी ! बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने पोलिसाचा मृत्यू

पश्चिम गोदावरीः पोलीसनामा ऑनलाईन – बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे.

भगवान प्रसाद (वय 45) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिका-याचे नाव आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार, प्रसाद सुरुवातीला बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. खेळता खेळता ते खाली वाकले आणि धाडकन जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्या साथीदारांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. त्यात प्रसाद यांचा मृत्यू झाला. गण प्रसाद पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. या घटनेमुळे परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे.