जगातील ‘या’ सर्वात सुंदर अभिनेत्रीला झालं स्वत:च्याच बॉडीगार्डवर खरं प्रेम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्री अँजेलिना जोली हिनं नुकताच (शुक्रवाद दि 5 जून 2020) आपला 45 वाढदिवस साजरा केला. आपल्या ब्युटी आणि बोल्डनेसनं तिनं इंडस्ट्रीत दीर्घकाळ राज्य केलं आहे. 1982 साली लुकींग टू गेट अप सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर तिचं नशीबच उजळलं आणि हॉलिवूडचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे उघडले. अँजेलिना जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ओळखली जाते. आता अँजेलिना बद्दल जी माहिती समोर आली आहे तिच्यावर विश्वास ठेवणं कदाचित तुम्हाला अशक्य होईल.

मीडियी रिपोर्टनुसार, अँजेलिना तिच्या हँडसम बॉडीगार्डला डेट करत आहे. गेल्या वर्षभरापासून अँजेलिना आणि बॉडीगार्डची जवळीक वाढत आहे. अँजेलिनाला तिच्या बॉडीगार्डवर खरं प्रेम झालं आहे. दोघंही आता एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. अँजेलिना चार मुलांची आई आहे आणि तिनं दोन मुलं दत्त घेतली आहेत. अशीही माहिती आहे की, या बातम्यांमुळं तिचा एक्स पती ब्रॅड पिट फारसा खुश नाही.

अँजेलिनानं आतापर्यंत 3 लग्न केले आहेत. तरीही ती एकटी होती. हॉलिवूड अॅक्टर ब्रॅड पिटसोबतही तिनं लग्न केलं होतं. काही वर्षांपूर्वीच ते वेगळे झाले. सध्या ती करिअर आणि मुलांवर फोकस करत होती. ब्रॅड पिट आणि तिची जोडी एकवेळची लोकप्रिय जोडी होती.

अँजेलिनाच्या करिअरबद्दलही अनेकांना माहिती नसेल. लुकिंग टू गेट आऊट या सिनेमातून अँजेलिनाने बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केलं. आपल्या करिअरबद्दल तिनं एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. अँजेलिनाने सांगितलं की, “ती एका वर्षाची असतानाच तिच्या आई-वडिलाचा घटस्फोट झाला होता. तिच्या आई आणि भावाने तिचा सांभाळ केला होता. तिला सुरुवातीला अभिनयात अजिबातच रस नव्हता. ती मोठी होत होती तेव्हा आई सोबत सिनेमा पाहण्यासाठी जात असायची. यानंतर तिला सिनेमाचं हे विश्व आवडू लागलं.

https://www.instagram.com/p/B6Lbe5Kn2jz/