…तर भर चौकात जोड्यान मारू; आ. राम कदम यांचा इशारा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तांडव ही वेबसिरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोव-यात सापडली आहे. या वेब सीरिजमध्ये दाखवलेला काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत या वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येईल. तसेच सीरिजचे अभिनेते दिग्दर्शकांवर एफआयआर दाखल करावा. त्यांनी हात जोडून, गुडघे टेकून समस्त देशाची आणि हिंदू समाजाची माफी मागावी असे म्हणत भाजप खासदार राम कदम यांनी भविष्यात चित्रपट विश्वातील लोकांकडून अशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अवमान झाल्यास त्यांना भरचौकात जोड्यान फटकावू, असा इशारा दिला आहे.

दरम्यान या प्रकरणी आ. कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आ. कदम म्हणाले की, तांडव या वेब सीरिजमध्ये असलेल्या दृश्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अली अब्बास तांडव वेब सीरिजचा दिग्दर्शक असून डाव्या विचारसरणीच्या अजेड्याला प्रोत्साहन दिल जात आहे. झीशानन या ठिकाणी भगवान शिव यांचा अवमान केला आहे.

दरम्यान, मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी आणि त्वरित गुन्हा नोंदवला जावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तांडव या वेबसिरिजमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही वेबसिरिज प्रदर्शित झाली असून या वेबसिरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.