Video : अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या सासूने ‘या’ वयात केला ‘धमाकेदार डान्स’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या लोक सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टीव असतात. कोण काय व्हिडीओ शेअर करेल आणि काय कधी सोशलवर व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. काही व्हिडीओ असे असतात जे खूप विनोदी असतात आणि आपलं लक्ष वेधून घेतात. मग तो डान्सचा व्हिडीओ असतो तर कधी एखादी फनी अ‍ॅक्टीव्हिटी असते. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. अनिकेत विश्वासरावच्या सासूचा हा व्हिडीओ असून सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. अनिकेतची पत्नी स्नेहाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, अनिकेतची सासू आणि स्नेहाची आई स्त्री सिनेमातील ‘मिलेगी मिलेगी’ या गाण्यावर धमाकेदार डान्स करत आहे. अनेकांनी त्यांच्या या डान्सचे कौतुक केले आहे. स्नेहाने हा व्हिडीओ पोस्ट करताना खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्नेहा म्हणते की, “कोण म्हणेल की ही माझी आई आहे. माझ्यापेक्षा दहा पटीने अधिक ऊर्जा आणि उत्साह तिच्यात आहे.”

अनिकेत आणि स्नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ या सिनेमात ते एकत्र काम करताना दिसले होते. यातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. स्नेहाबद्दल बोलायचे झाले तर स्वप्नील जोशीच्या ‘लाल इश्क’ या सिनेमात स्नेहा दिसली होती. अनिकेतने याआधी अनेक सीरीयल्समध्ये तसेच सिनेमातही काम केले आहे. गेल्याच वर्षी अनिकेत आणि स्नेहा लग्नबंधनात अडकले आहेत. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत असे दिसत आहे.

Loading...
You might also like