अनिल अंबानीने ‘ही’ कंपनी काढली विकायला : १२०० कोटींची अपेक्षा

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – अनिल अंबानी यांनी त्यांच्या मालकीचा बिग एफएम रेडिओ विकण्याची तयारी सुरु झाली आहे. १२०० कोटी रुपये किंमत येण्याची अपेक्षा अंबानींना आहे. कर्जाच्या वाढत्या ओझ्याखाली दबत चालल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. याआधी देखील त्यांनी आपला म्युचूअल फंडचा व्यवसाय विकला होता. रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (RBN) ही अनिल अंबानींच्या वाट्याला आलेली कंपनी आहे.या कंपनीच्या विक्रीतून त्यांना १२०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क हि कंपनी बिग एफएम हे नावाजलेले चॅनेल चालवते. सध्या बिग एफएमकडे ५९ एफएम स्टेशन आहेत. या कंपनीच्या खरेदीसाठी जागरण प्रकाशनची एक उप कंपनी म्यूजिक ब्रॉडकॉस्ट लिमिटेड (MBL) इच्छुक असल्याचेच सांगितले जात आहे. या खरेदी विक्री संबंधीचा व्यवहार या आठवड्यात पूर्ण होऊ शकतो असे सांगितले जात आहे.

दरम्यान, जागरण या समूहाने २०१४ मध्ये रेडिओ सिटी हे चॅनेल खरेदी केले होते, त्यामुळे जर आता हा व्यवहार झाला तर रेडिओ सिटी हे भारतातले सर्वात मोठे एफएम चॅनेल होणार आहे.