Anil Awachat | ‘मुक्तांगण’चा आधारवड हरपला ! अवलिया डॉ. अनिल अवचट यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Anil Awachat| व्यसनापासून हजारोंना मुक्ती देणारे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे (Muktangan Rehabilitation Center) संचालक, पत्रकार, लेखक आणि समाजसेवक बहुआयामी व्यक्तीमत्व डॉ. अनिल अवचट (Anil Awachat) यांचे आज (दि. 27 जानेवारी 2022) दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते.

कोणताही विषय समजून घ्यायचा तर तो मुळापासून समजावून घेऊन लोकांना तो बारकाईने समजून सांगण्याची त्याची वेगळी धाटणी होती. त्यातूनच त्यांनी वेगवेगळ्या विषयावर लेखन केले. त्यांची आतापर्यंत २२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपली पत्नी डॉ. सुनंदा अवचट (Dr. Sunanda Awachat) यांच्या सहकार्याने देशातील पहिले मुक्तांगण (Muktangan) व्यसनमुक्ती केंद्र डॉ. अवचट (Anil Awachat) यांनी स्थापन केले आहे. त्यांनी येथे व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धत जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. ओरीगामीच्या माध्यमातून लहान मुलांसह त्यांच्या पालकांशी अवचट यांचा नेहमीच संवाद साधत.

डॉ. अनिल अवचट यांचा जन्म पुणे (Pune News) जिल्ह्यातील ओतूर (Otur) येथे झाला. त्यांनी पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून (B J Medical College Pune) ‘एमबीबीएस’ची (MBBS) पदवी घेतली. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.

बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यात त्यांनी सामाजिक चळवळीत काम केले. येथील अनुभवावर पुर्णिया हे पहिले पुस्तक १९६९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.

मुक्तांगण आणि पु. ल. देशपांडे

‘गर्द’ या विषयावर अभ्यास केल्यावर त्याचा तरुण पिढीवर पुढील काळात मोठ्या परिणाम होणार असल्याचे डॉ. अनिल अवचट यांच्या लक्षात आले. आख्खी पिढीच्या पिढी या व्यसनात बरबाद होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना बोलून दाखविली. त्यासाठी काही करण्याचा विचार व्यक्त केला. तेव्हा डॉ. सुनंदा आणि अनिल अवचट (Dr. Anil Awachat) यांची ‘मुक्तांगण’ची कल्पना पु ल देशपांडे यांनी सर्वप्रथम २५ लाख रुपयांची देणगी देऊन ती प्रत्यक्षात आणली. त्यानंतर ही व्यसनमुक्तीची चळवह देशभर फोफावली.

प्रकाशित पुस्तके

अमेरिका (इ.स.१९९२)
अक्षरांशी गप्पा
आपले‘से’
आप्त (१९९७)
कार्यमग्न
कार्यरत (१९९७)
कुतूहलापोटी (२०१७)
कोंडमारा (१९८५)
गर्द (१९८६)
छंदांविषयी (२०००)
छेद
जगण्यातले काही (२००५)
जिवाभावाचे (२०१७, मौज प्रकाशन) – व्यक्तिचित्रे
दिसले ते (२००५)
धागे आडवे उभे (१९८६)
धार्मिक (१९८९)
पिपल्स : ‘माणसं’ पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर (सहलेखक- विश्राम गुप्ते)
पुण्याची अपूर्वाई (२०१०)
पूर्णिया (१९६९)
प्रश्न आणि प्रश्न (२००१)
बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन
मजेदार ओरिगामी
मस्त मस्त उतार (काव्यसंग्रह)
माझी चित्तरकथा
माणसं! (१९८०)
मुक्तांगणची गोष्ट पुस्तक :
मोर (१९८६)
रिपोर्टिंगचे दिवस
लाकूड कोरताना
वनात..जनात
वाघ्या मुरळी (१९८३)
वेध
शिकविले ज्यांनी
संभ्रम (१९७९)
सरल तरल
सुनंदाला आठवताना
स्वत:विषयी (१९९०)
सृष्टीत…गोष्टीत (२००७)
सृष्टी-दृष्टी, वनात-जनात (बालवाङ्मय)
हमीद (१९७७)
हवेसे

पुरस्कार

व्यसनमुक्ती क्षेत्रातील कायार्साठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)

महाराष्ट्र राज्य वाडमय पुरस्कार

२०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार

‘सृष्टीत.. गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार

डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली आहेत.

अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).

साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.

महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.

डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार

Web Title :- Anil Awachat | Muktangan Rehabilitation Center Dr. Avaliya Anil Avchat passes away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे, पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या