Anil Deshmukh Case | पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचं प्रकरण ! अनिल देशमुख प्रकरणात पुण्यातील ‘त्या’ पोलीस उपायुक्तांची ईडीकडून चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Case) यांची चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) चौकशी सुरु आहे. सचिन वाझेचीही (sachin vaze) उर्वरित चौकशी पार पडली आहे. त्याच्यासोबत देशमुख (Anil Deshmukh Case) हे देखील उपस्थित होते. परंतु देशमुख यांच्याशी निगडीत मनी लाँडरिंग (Money laundering) आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या (police officers transfer) रॅकेटमध्ये पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या पाठिशी चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Case) यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी (IPS transfer racket) ईडी (ED) आता पोलीस उपायुक्त (DCP) दर्जांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. यामध्ये पुणे पोलीस (Pune Police) दलातील एका पोलीस उपायुक्तांचा देखील समावेश आहे. यापूर्वी ईडीने राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड (Kailash Gaikwad) यांना समन्स बाजवत चौकशीला बोलावलं होते. काही दिवसांपूर्वी सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनाही चौकशीला बोलावलं होत.

 

 

या प्रकरणात नुकतेच आणखी एका पोलीस उपायुक्तांचा जबाब ईडीने नोंदवला आहे.
ट्रान्सफर पोस्टिंग प्रकरणात (transfer posting case) ईडीने पुणे वाहतूक शाखेचे (pune traffic branch)
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shriram) यांची चौकशी केली आहे.
ईडीने त्यांना गुरुवारी समन्स पाठवले होते. त्यानंतर श्रीरामे दुपारी एकच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले.
त्यावेळी त्यांची 7 तास कसून चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे.
आज ईडीने अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (Akola SP G. Sridhar) यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून ते आज चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh Case | enforcement directorate inquires pune police traffic dcp rahul shrirame in anil deshmukh case ips transfer racket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा