Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करण्यात आल्यानंतर ते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत. देशमुख हे गेल्या तीन महिन्यापासून कोणत्याही चौकशीला हजार राहिले नाही. त्यामुळे आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (chief secretary sitaram kunte) आणि प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) या दोघांना समन्स बजाविल्याचे समजते. त्या दोघांनाही देशमुख (Anil Deshmukh) यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठीची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former mumbai police commissioner param bir singh) यांनी टाकलेल्या टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर देशमुख अडचणीत आले. देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआय व ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ते एकदाही चौकशीला सामोरे आले नाहीत. ईडीकडून चौकशीसाठी देशमुख यांना पाच वेळा सम्सन बजावबयात आले होते. मात्र विविध करणे देत त्यांनी चौकशी टाळली. त्यांच्यावर ‘लूक आउट’ नोटीस जारी करूनही ते हजर झालेले नाहीत. त्यातच आता तीन महिन्यापासून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने सीबीआयने त्याबाबत मुख्य सचिव कुंटे व डीजीपी पांडे यांना समन्स बजाविले आहेत.

 

Web Title : Anil Deshmukh | cbi summons chief secretary sitaram kunte and dgp sanjay pandey anil deshmukh case ed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Yogesh Tilekar | ओबीसींचा इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा; भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांची मागणी

Tata Tigor | केवळ 4,111 रुपयांच्या EMI वर घर घेऊन या Tata ची ही शानदार कार, जाणून घ्या पूर्ण ऑफर

Pune Congress | स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा युटर्न, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी (व्हिडीओ)