Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! नागपुरमधील मालमत्तांवर आयकर विभागाचा छापा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Anil Deshmukh | मागील अनेक दिवसांपासून ED च्या रडारवर असणारे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आज (17 सप्टेंवर) रोजी अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापा (Raid) टाकला आहे. देशमुख यांच्या नागपुरमधील मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकल्याने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

मागील अनेक दिवसांपासून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची सक्तवसुली संचालनालय (ED) कडून चौकशी सुरु आहे.
मात्र, आज त्यांच्या नागपुर येथील घरी आयकर विभागाचं पथक (Income Tax Department) दाखल झालं आहे.
तसेच नागपुरच्या जीपीओ चौक येथील निवासस्थानावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली आहे.
याचबरोबर देशमुख यांच्या काटोल निवासस्थानावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.
यासोबतच नागपूरच्या हॉटेल ट्राव्होटेल येथेही आयकर विभागाने छापा टाकला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सीबीआयने (CBI) पहिल्यांदा छापा टाकला होता. यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ED) 24 एप्रिल रोजी ईडीने पहिल्यांदा छापेमारी केली होती. त्यांनतर 16 मे, 26 मे, 16 जुलै आणि 6 ऑगस्टला परत सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई केली होती.
यांनतर आता आज (17 सप्टेंबर) रोजी आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Department) केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर त्यांच्या मागे ED and CBI चा ससेमिरा लागला.
काही दिवसांपूर्वी मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांच्या मालमत्तांवर छापा सुद्धा टाकला.
दरम्यान, ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास 5 वेळा समन्स बजावले आहे.
मात्र, देशमुख हे ED च्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीत.
त्यातच आता आयकर विभागाने छापा टाकला आहे.

Web Title : Anil Deshmukh | income tax department raided on anil deshmukh property in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health News | दुसर्‍या लाटेनंतर लहान मुलं आणि प्रौढांमधील मणक्याच्या वेदनांमध्ये चार पटींनी वाढ; मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा इशारा

Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन अजित पवार म्हणाले…

Raosaheb Danve | युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी चालतील का?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…