Anil Deshmukh | अनिल देशमुखांचे जावई CBIच्या ताब्यात, कुटुंबियांकडून अपहरणाचा आरोप?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचे वरळी, मुंबई येथून अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला आहे. मात्र, देशमुख यांचे जावई आणि त्यांचे वकील यांना 10 जणांच्या सीबीआयच्या (CBI) पथकाने वरळीतील सुखदा इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर वरळी सी लिंक परिसरात ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. (Anil Deshmukh son-in-law Gaurav Chaturvedi in CBI custody)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटीच्या वसूलीच्या आरोपानंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे.
यामध्ये इतर केंद्रीय तपास यंत्रणाही चौकशी करत आहेत.
काल-परवाच अनिल देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याचे वृत्त होते,
मात्र आजच्या अटकेच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वसूली प्रकरणात आतापर्यंत अनिल देशमुख यांच्या जावयाचे नाव यापूर्वी कधीही आले नव्हते.
आज अचानक 10 जणांच्या पथकाने त्यांचे जावई आणि वकीलांना ताब्यात घेतल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

सचिन सावंत यांची मोदी सरकारवर टीका या अटकेच्या कारवाईनंतर सचिन सावंत (sachin sawant tweet) यांनी एक ट्विट केले असून यामध्ये म्हटले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे समजते.
हे अतिशय गंभीर आहे. देशात मोदीशाही चालू आहे.
नियम कायदे गुंडाळले आहेत. हम करे सो कायदा आहे,
असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध!

 

Web Title : anil deshmukh s son in law gaurav chaturvedi in cbi custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | 7वा वेतन आयोग ! महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी, जुलैच्या आकड्यांमध्ये इतका वाढला इंडेक्स

Job | सुनील माने यांच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन

Pune News | भारतीय दलित कोब्रा संघटनेच्यावतीने पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन