Anil Deshmukh | सीबीआयला राज्य सरकार सहकार्य करत नाही, अधिकाऱ्याला सहाय्यक पोलिस आयुक्त धमकावतात

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात सीबीआयने (CBI) मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) धाव घेतली आहे. सीबीआयने महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) स्पष्ट आदेश असूनही अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला सहकार्य करत नाही, असे म्हटले आहे. एसएसजीच्या (SSG) माध्यमातून सीबीआयने न्यायालयात आरोप केला की, सहकार्य करण्याऐवजी मुंबई पोलीस (Mumbai Police) सहायक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police) या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याला धमकावत आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा (Allegations of corruption) तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक दस्तवेज हस्तगत करण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Senior IPS officer Rashmi Shukla) यांनी पोलीस दलातील बदल्या व नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत काही महत्त्वाचा दस्तऐवज पोलिस महासंचालकांपुढे (DGP) सादर केला होता. अनिल देशमुख यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे आवश्यक आहेत. ती कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावी, यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाला (State Intelligence Department) पत्र लिहिले होते. मात्र, त्यांनी अन्य एका तपासासाठी कागदपत्रांची आवश्यकता आहे, असे म्हणत ती देण्यास नकार दिला होता, असे सीबीआयने अर्जात म्हटले होते.

 

राज्य सरकारचे हे वर्तन उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे.
कारण यापूर्वी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाण्यासाठी उच्च न्यायालयाला त्यांच्या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केली होती.
परंतु न्यायालयाने तसे करण्यास नकार दिला होता.
राज्य सरकार तपासात सतत अडथळे आणत असून राज्य सरकारला कागदपत्रे देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती सीबीआयने याचिकेत केली होती.

 

Web Title : anil deshmukh state government not cooperating cbi mumbai acp threatening cbi office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maruti Suzuki च्या ‘या’ कारच्या प्रेमात पडला संपूर्ण देश, जोरदार होत आहे खरेदी – पहा तिची वैशिष्ट्य

Pune Corporation | अखेर ‘स्वच्छ’ संस्थाच पुणे महापालिकेच्या मदतीला धावून आली; पालिकेच्या विनंतीवरून नव्याने समाविष्ट गावातील कचर्‍याचे विलगीकरण केले सुरू

Satara BJP | लाच घेणे पडले महागात, भाजपच्या वाई नगराध्यक्षांवर राज्य सरकारची मोठी कारवाई