Anjali Damania On Ajit Pawar | अजित पवारांवर पोर्शे कार अपघातावरून अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप, पोलीस आयुक्तांशी काय बोलणं झालं?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Anjali Damania On Ajit Pawar | पुण्यातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident Pune) प्रकरणाची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. बिल्डर अग्रवालच्या (Builder Vishal Agarwal Son) मुलाला वाचवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्याचे तपासात उघड होत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलची आदलाबदल (Blood Sample Tampering) करणाऱ्या ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे नाव घेतले जात असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांकडे बोट दाखवल्याने खळबळ उडाली आहे.(Anjali Damania On Ajit Pawar)

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून यामध्ये म्हटले आहे की, पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी (Pune CP) स्पष्टीकरण द्यावं. फोन केला असेल तर अजित पवारांचा मुख्यमंत्री राजीनामा घेतील का? असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, मी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये मी माझ्या मनातील शंका उपस्थित केल्या होत्या. पुण्याच्या भीषण अपघातात दोन जणांचा जीव घेतला. एका श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा काम करत आहे असे काहीसे चित्र होते. त्याच्या मागे कोण होते? अशी शंका माझ्या मनात होती.

अंजली दमानिया यांनी म्हटले, म्हणून मी ते ट्वीट डीलिट केले. परंतु माझी शंका आता खरी ठरत आहे की काय असे वाटत आहे.
मी माध्यमात बातमी पाहिले की, अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना फोन केला. हीच शंका माझ्या मनात होती.
प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार पहिले चार दिवस एकही शब्द बोलले नाही.

मी सकाळी उठून काम करतो म्हणारे पुण्याचे पालकमंत्री अपघाताबद्दल त्यांनी एक शब्द देखील काढला नाही.
प्रत्येक वेळी सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. पण ही सारवासारव कोणासाठी चालली होती? असा सवाल दमानियांनी केला.

त्या पुढे म्हणतात, पुण्याच्या आयुक्तांनी अजित पवारांचा फोन आला होता तर त्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे.
फोन केला की नाही? फोन केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा.
मु्ख्यमंत्र्यांनी आज अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी. फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hinjewadi Pune Crime News | पिंपरी : पिस्टलचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल व 6 काडतुसे जप्त (Video)

Kalyani Nagar Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता ससून रुग्णालयातील शिपायाला अटक

Ajit Pawar-Sharad Pawar | … म्हणून 2004 ला मुख्यमंत्रीपद नाकारल्याचा अजित पवारांचा दावा