Anna Hazare and Jitendra Awhad । जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या शुभेच्छांवरून अण्णा हजारेंनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या (15 जून) रोजी वाढदिवसांनिमित्त (Birthday Wishes) अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता.
तसेच, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes) दिल्या आहेत.
मात्र, शुभेच्छा देताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेलं ट्वीट सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला.
त्यानंतर आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या शुभेच्छावरून अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील सणसणीत उत्तर दिल आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ‘प्रिय अण्णा.. असं म्हणत आपला शुभेच्छा संदेश लिहिला आहे. त्यात ते म्हणतात की, ‘प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव,
ढासळती अर्थव्यवस्था, करोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes) देण्यासाठी हा मेसेज होता.
आव्हाड यांच्या शुभेच्छावरून अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी सणसणीत उत्तर देत म्हणाले, तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?. असा उलट सवाल त्यांनी केला आहे.

अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले, मी एक सामान्य माणूस आहे. जनतेची सेवा करतो. पण तुम्ही तर मंत्री आहात, या प्रश्नांसाठी मग तुम्ही काय केले?
प्रत्येक प्रश्नासाठी हजारे यांनीच आंदोलन करावे का? तुम्हीही जनतेचे सेवक आहात, मग तुम्ही जनतेसाठी काम का करीत नाही?, अशा शब्दात अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना शुभेच्छांवरून सणसणीत उत्तर दिल आहे.

Web Title : anna hazare replied on birthday wishes given by jitendra awhad

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित