NEET चा निकाल जाहीर , कल्पना कुमारी पहिली

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बारावी नंतर मेडिकल ला प्रवेश मिळण्यासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या (NEET )नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट चा निकाल आज अखेर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत 720 पैकी 691 गुण मिळवत कल्पना कुमारी पहिली आली आहे. नीट परिक्षेच्या निकालाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर अखेर सोमवारी (४ जून) सीबीएससीकडून निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना आपला निकाल cbseneet.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. दहावी बारावी आणि आता नीट परीक्षांमध्ये देखील मुलींनीच बाजी मारली आहे.

देशभरातील विविध केंद्रांवर ७ मे रोजी NEET 2018 परिक्षा घेण्यात आली होती. हा निकाल जाहीर करण्यात येऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळत निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला. दरम्यान, सीबीएससीने यापूर्वीच परिक्षेची उत्तर सूची जाहीर केली होती. ही उत्तर सूची पाहिल्यानंतर जर विद्यार्थ्यांना यावर काही आक्षेप असेल तर त्यांनी दोन दिवसांचा म्हणजेच २७ मेपर्यंतचा अवधी दिला होता.देशभरातील १३,२६,७२५ उमेदवारांनी नीटची परिक्षा दिली होती.

एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी सीबीएसईकडून ही प्रवेश परिक्षा घेतली जाते. नीटचा निकाल ५ जून रोजी जाहीर होणार होता. मात्र, एक दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीयसाठी नीट प्रवेश परिक्षा ६ मे रोजी घेण्यात आली होती. देशभरात यासाठी २२५५ केंद्रांवर ही परिक्षा झाली होती. देशभरात हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, मराठी, ओरिया, बंगाली, आसामी, तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली होती.