anti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 30 जून रोजी होणार होत्या निवृत्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या (pune municipal corporation) महिला अधिकाऱ्यास पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे 30 जून रोजी महिला अधिकारी सेवानिवृत्त होणार होत्या. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) केलेल्या धडक कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मंजुषा इधाटे Manjusha Idhate असे पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस Shivajinagar Police ठाण्यात गुन्हा Crime दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुषा या महापालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून नोकरीस आहेत.
दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक Builders आहेत.
त्यांची पालिकेत टीडीआर प्रकरणं सुरू आहेत.
ते प्रकरण महिला अधिकारी Women Officers यांच्याकडे होते.
त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत त्यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

या कारवाईने पालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे महिला अधिकारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वत्र हळहळ देखील व्यक्त होत आहे.

Web Title : anti corruption bureau pune Women officers of Pune Municipal Corporation were to retire on June 30 after accepting a bribe of Rs 50,000

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक