Anuradha Paudwal Joins BJP | अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश, लोकसभा लढणार की, अन्य जबाबदारी मिळणार?

मुंबई : Anuradha Paudwal Joins BJP | बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भाजपामध्ये केला. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होत असतानाच अनुराधा पौडवाल भाजपवासी झाल्या आहेत. त्या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार की भाजपा त्यांच्याकडे इतर कोणती जबाबदारी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी या भाषांमध्ये गायन केले आहे. १९७३ मध्ये अभिमान चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटांतील गाण्यांसोबतच त्यांनी अनेक भक्ती गीते गायली आहेत.

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जय श्रीराम! मी आज भाजपाची सदस्य झाली आहे. मला आज खूप आनंद झाला आहे. कारण मी आज त्या सरकारशी जोडली गेले आहे ज्या सरकारचे नाते सनातन धर्माशी आहे. मागच्या ३५ वर्षांहून अधिक काळ मी भक्तिगीते गात आहे. समाधान या गोष्टीचे आहे की रामलल्लाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे पाच मिनिटांसाठी गाणे म्हणता आले.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, गंगा नदीची आरती माझ्या आवाजात असूत ती सकाळ-संध्याकाळ होते.
या सगळ्या भक्ति गीतांवर कळस चढवण्याचे काम रामलल्लासमोर म्हटलेल्या भजनाने केले.
त्यावेळी खूप समाधानी वाटले, कारण माझं स्वप्न पूर्ण झाले. मी भाजपात आले हे माझे भाग्य आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions |लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, 72 तासात तीन मंत्रिमंडळ बैठका अन् 62 निर्णय

Marged Villages In PMC | पुणे : समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 9 लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती

Pune Dattanagar Double Murder Case | पुण्यात दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस, पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून

PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ